Gangmen Technologies

Success Stories

परिवर्तनाच्या दिशेने Gangmen ची वाटचाल

विश्वास, सहकार्य आणि तंत्रज्ञानाच्या बळावर साखर उद्योगात घडत असलेले सकारात्मक परिवर्तन.

दांडेगावकर साहेबांचे मार्गदर्शन -

आमच्यासाठी प्रेरणेचा स्रोत

साखर उद्योगाला नवी दिशा आणि सकारात्मक ऊर्जा देणारे,
साखर उद्योगाचा सन्मान उंचावण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे,
साखर संघाचे माजी चेअरमन व पूर्णा शुगर फॅक्टरी (युनिट १ व २) चे चेअरमन, आदरणीय दांडेगावकर साहेब यांची भेट घेणे आणि त्यांचे मार्गदर्शन लाभणे, हे मी माझे मोठे सौभाग्य समजतो.

साखर उद्योगाच्या भविष्याविषयी वाटचालीबाबत त्यांनी केलेले सविस्तर आणि उच्च स्तरीय मार्गदर्शन आम्हाला नक्कीच दिशादर्शक ठरेल. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सकारात्मक ऊर्जा आम्हा सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे.

आमच्या टीमच्या ऊर्जेचा स्रोत वाढवल्याबद्दल आणि वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही दांडेगावकर साहेबांचे मनःपूर्वक आभार मानतो.

Gangmen' टीम सदैव त्यांच्या ऋणी राहील.

सहकार्यातून परिवर्तनाकडे:

साखर उद्योगाच्या नव्या पर्वाची सुरुवात!

विघ्नहर्ती सहकारी साखर कारखाना येथे 'Gangmen App' संदर्भातील आमची बैठक अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक वातावरणात पार पडली. या बैठकीतून कारखान्याचे व्यवस्थापन आणि अधिकारी वर्गाचा एक नवा, विजनरी दृष्टिकोन आम्हाला पाहायला मिळाला.

या बैठकीत प्रकट झालेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी:
सकारात्मक विचार आणि सहयोगी भावना: तंत्रज्ञानाचा स्वीकार करून पुढे जायची कारखान्याची तयारी.
परिवर्तनवादी दृष्टिकोन: साखर उद्योगातील पारंपरिक लेबर यंत्रणेमध्ये (मजूर पुरवठा पद्धत) सकारात्मक बदल घडवून आणण्याचा मानस.

"जर सर्वांनी असाच डिजिटल आणि पारदर्शक सहयोग दिला, तर लेबर यंत्रणेतील फसवणूक आणि होणारी गैरव्यवहारी पूर्णपणे संपुष्टात येईल. यातूनच एक स्वच्छ, पारदर्शक आणि प्रगतिशील साखर उद्योग आकारास येईल, हा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

"या महत्त्वपूर्ण बैठकीबद्दल आणि 'Gangmen' टीमची ऊर्जा वाढवल्याबद्दल मुख्य संचालक अधिकारी आदरणीय साहेब तसेच त्यांच्या सर्व सहयोगी कर्मचाऱ्यांचे 'Gangmen' टीमतर्फे मनापासून आभार!

एकत्र येऊन आपण साखर उद्योगात एक नवे पर्व सुरू करूया!

ऑगस्ट्य शुगर फॅक्टरीमध्ये ‘Gangmen App’ चे प्रशिक्षण

डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल!

‘Gangmen App’ चा वापर कसा करावा, याविषयी ऑगस्ट्य शुगर फॅक्टरीच्या कर्मचाऱ्यांसाठी नुकतेच एका विशेष प्रशिक्षण आणि डेमो सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी ऑगस्ट्य शुगर फॅक्टरीचे मुख्य शेती अधिकारी आदरणीय श्री. अजित घोलवे सर यांनी आपला मौल्यवान वेळ देऊन संपूर्ण टीमला मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या या विशेष सहकार्याबद्दल Gangmen तंत्रज्ञान टीम आणि उपस्थित अधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार!

तसेच, या प्रशिक्षणात उत्साहाने सहभागी झालेल्या ऑगस्ट्य शुगर फॅक्टरीच्या सर्व कर्मचाऱ्यांचेही Gangmen टीमतर्फे विशेष आभार. तंत्रज्ञानाच्या या वापरामुळे आपले काम अधिक सोपे आणि गतिमान होईल, असा आम्हाला विश्वास आहे.

मार्गदर्शनातून प्रेरणा,

सहकार्यातून विकासाची नवी दिशा!

महाराष्ट्र राज्य समाज कल्याण आयुक्तांनी उसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून गोरगरीब कामगारांच्या कल्याणासाठी माझ्यासोबत जी सविस्तर चर्चा केली, तो माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आणि प्रेरणादायी क्षण होता.

जेव्हा कधी कामाच्या व्यापातून थकवा जाणवतो, तेव्हा हे असे क्षण आठवतात आणि पुन्हा जिद्दीने काम करण्याची नवी ऊर्जा मिळते. साहेबांनी ज्या आत्मीयतेने माझे मार्गदर्शन केले आणि मला सकारात्मक दिशा दाखवली, त्याबद्दल मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहीन.

आज 'Gangmen App' ला जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, त्यामागे साहेबांसारख्या मार्गदर्शकांचा पाठिंबा आणि माझ्यासारख्या सर्व कष्टकरी बांधवांचा विश्वास आहे. सर्वांच्या या सहकार्यामुळेच आपण विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत.

परिवर्तनाची नवी दिशा:

सर सेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरीसोबत सकारात्मक संवाद!

"परिवर्तन हे कुठल्याही क्षेत्रात आणि कधीही घडू शकतं..." हाच विचार घेऊन आमच्या Gangmen Technologies च्या टीमने एक पाऊल पुढे टाकले आहे.

माननीय मंत्री श्री. हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार, सर सेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरीच्या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आमच्या 'Gangmen Technologies' च्या परिवर्तनात्मक आणि नाविन्यपूर्ण विचारांचे अत्यंत उत्साहाने स्वागत केले.

"आम्ही नेहमीच परिवर्तनाच्या आणि प्रगतीच्या दिशेने काम करत असतो," हा फॅक्टरीच्या कर्मचाऱ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आमच्या संपूर्ण टीमची ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरला.

आमच्या तंत्रज्ञानाला आणि संकल्पनेला इतका उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल आम्ही सर सेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरीच्या सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि व्यवस्थापनाचे संपूर्ण Gangmen Team कडून मनःपूर्वक आभार मानतो!

तुमची हीच साथ आम्हाला भविष्यात अधिक उत्तम काम करण्याची प्रेरणा देईल.

साखर उद्योगाच्या डिजिटल परिवर्तनाकडे

आणखी एक यशस्वी पाऊल!

आज पुन्हा एकदा २ व्या साखर कारखान्याला 'Gangmen तंत्रज्ञानासाठी' (Gangmen Technologies) यशस्वीरित्या ऑनबोर्ड करण्यात आले. आम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहोत, यावर या यशाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.

साखर उद्योगाकडून असाच सकारात्मक प्रतिसाद मिळत राहिल्यास, या क्षेत्रातील गैरव्यवहारांना लवकरच आळा बसेल आणि साखर उद्योग एक फायदेशीर व्यवसाय म्हणून नावारूपास येण्यास वेळ लागणार नाही.

डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने

हमीदवाडा साखर कारखान्याचे महत्त्वपूर्ण पाऊल!

हमीदवाडा सहकारी साखर कारखान्यातील सर्व सन्माननीय कर्मचाऱ्यांसाठी नुकतेच 'Gangmen' मोबाईल ॲप आणि आधुनिक तंत्रज्ञानाबाबत एका विशेष सादरीकरणाचे (Presentation) आयोजन करण्यात आले होते. कारखान्याच्या ऊस पुरवठा आणि शेती व्यवस्थापनात 'Gangmen' तंत्रज्ञानामुळे किती मोठे आणि सकारात्मक परिवर्तन होणार आहे, याची सविस्तर माहिती या वेळी कर्मचाऱ्यांना देण्यात आली.

या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे कामात अचूकता, पारदर्शकता आणि वेग येणार असून, मोबाईल ॲप प्रत्यक्षात कसे वापरायचे आणि त्याचे फायदे काय आहेत, याचे थेट प्रात्यक्षिक या प्रसंगी दाखवण्यात आले.

प्रमुख उपस्थिती आणि मोलाचे सहकार्य:
या कार्यक्रमाला कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी आदरणीय मोरबाळे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी 'Gangmen' टेक्नॉलॉजीच्या या नाविन्यपूर्ण संशोधनाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला.

“हे तंत्रज्ञान कारखान्याला परिवर्तनाच्या एका नव्या दिशेने घेऊन जाईल,” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी यापुढील वाटचालीत खंबीरपणे सोबत राहण्याचे आश्वासन दिले.

सौजन्य भेट व मार्गदर्शक संवाद –

‘Gangmen App’च्या वाटचालीला नवी दिशा!

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे आदरणीय चेअरमन माननीय श्री. गणपतरावजी तडके साहेब यांची स्नेहभेट घेतली. या प्रसंगी त्यांना 'Gangmen App' या आमच्या नाविन्यपूर्ण टेक्नॉलॉजीबद्दल सविस्तर माहिती दिली.

साखर उद्योग आणि ऊसतोडणी/वाहतूक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणि गती कशी आणता येईल, यावर साहेबांशी अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. या क्षेत्रातील त्यांच्या दांड्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी 'Gangmen App'च्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत मोलाचे व दिशादर्शक मार्गदर्शन केले.

आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल आदरणीय तडके साहेब यांचे मनापासून आभार!

महादेव मुरकुटे (CEO, Gangmen Technology)

आदर्श नेतृत्वाची प्रेरणादायी कहाणी:

माजी साखर आयुक्त श्री. शेखर गायकवाड!

एक आदर्श, प्रामाणिक आणि शेतकरी हिताचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्त्व: माजी साखर आयुक्त श्री. शेखर गायकवाड!

साखर आयुक्तपद म्हटलं की केवळ प्रशासकीय जबाबदारी नाही, तर लाखो ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाचा समतोल राखणारा एक महत्त्वाचा दुवा असतो. हेच पद आपल्या कार्यकाळात अत्यंत प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि संवेदनशीलतेने भूषवणारे अधिकारी म्हणजे श्री. शेखर गायकवाड (IAS).

आदरणीय कैलासवासी बबनरावजी ढाकणे साहेब:

समाजसेवेची प्रेरणादायी आठवण

आदरणीय कैलासवासी बबनरावजी ढाकणे साहेब यांची आज खूप आठवण येत आहे. साहेब आज आपल्यात नसले, तरी त्यांनी दाखवलेला मार्ग आणि त्यांचे विचार आजही आपल्या मनात जिवंत आहेत.

त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजासाठी आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी समर्पित होते. राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करताना त्यांनी आम्हाला नेहमीच योग्य दिशा दाखवली आणि वडिलांसारखे खंबीर मार्गदर्शन केले.

मनःपूर्वक आभार आणि कृतज्ञता –

सहकार्याने डिजिटल परिवर्तनाची नवी दिशा!

माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार तथा महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष मा. प्रकाश दादा सोळंके साहेब यांनी Gangmen Technologies Private Limited आणि आमच्या संपूर्ण टीमला दिलेला मान-सन्मान, प्रोत्साहन आणि सहकार्य आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे.

साखर उद्योगाच्या डिजिटल परिवर्तनासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांना मा. दादांनी दिलेली दाद आणि प्रोत्साहन यामुळे आमच्या संपूर्ण टीमचा आत्मविश्वास आणि जबाबदारी आणखी वाढली आहे.

त्यांनी आमच्या कंपनीवर दाखवलेला विश्वास, दिलेले मार्गदर्शन आणि सहकार्य याबद्दल Gangmen Technologies Private Limited च्या संपूर्ण टीमतर्फे मा. प्रकाश दादा सोळंके साहेबांचे मनःपूर्वक आभार!

आपण दिलेला सन्मान आणि सहकार्य आमच्यासाठी कायम स्मरणात राहील. भविष्यातही साखर उद्योग, शेतकरी, ऊसतोड कामगार, वाहतूकदार आणि कारखाने यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका सक्षम डिजिटल व्यवस्थेशी जोडण्यासाठी आम्ही अधिक जोमाने कार्य करत राहू.

आपले प्रोत्साहन हीच आमच्यासाठी पुढे जाण्याची नवी ऊर्जा आहे. — संपूर्ण टीम
Gangmen Technologies Private Limited

माननीय पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांचे मार्गदर्शन

आणि Gangmen Technologies वरील विश्वास!

सन्माननीय ना. पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांना मनःपूर्वक आभार

सन्माननीय ना. पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांनी Gangmen Technologies Private Limited च्या कार्याची पाहणी करून आमच्या संकल्पना, तंत्रज्ञान आणि साखर उद्योगासाठी आम्ही विकसित करत असलेली डिजिटल प्रणाली उपयुक्ततेची जाणून घेतले, हा आमच्या संपूर्ण टीमसाठी अत्यंत सन्मानाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरला.

त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान ऊसतोड कामगारांच्या हितासाठी त्यांची असलेली तळमळ, कामगारांच्या प्रश्नांविषयीची संवेदनशीलता आणि साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी त्यांचे योगदान आम्हाला अधिक जवळून जाणून घेता आले.

विशेषतः: ऊसतोड कामगारांचे जीवन अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता येईल, याबाबत मिळालेले त्यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा आमच्यासाठी अत्यंत मोलाचे आहे.

Gangmen Technologies Private Limited च्या कार्यावर दाखवलेला विश्वास, दिलेला वेळ, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन याबद्दल ना. पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांचे Gangmen Technologies च्या संपूर्ण टीमतर्फे मनःपूर्वक आभार!

ऊसतोड कामगार, शेतकरी, वाहतूकदार आणि साखर कारखाने यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका पारदर्शक आणि सक्षम डिजिटल व्यवस्थेशी जोडण्याच्या आमच्या ध्येयासाठी अशा मार्गदर्शनामुळे निश्चितच नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते.

आपला विश्वास आणि प्रोत्साहन आमच्यासाठी अत्यंत मोलाचे आहे. 🙏— संपूर्ण टीम
Gangmen Technologies Private Limited

Ready to Digitize Your Sugarcane Operations?

Whether you're looking for a product demonstration, implementation support, or simply want to learn more about Gangmen, our team is ready to help.